Bhairavnath Yatrotsava : भैरवनाथ यात्रोत्सवाचा सिन्नरमध्ये उत्साह; मिरवणुकीत अबालवृद्धांचा सहभाग

Bhairavnath Yatrotsava
Bhairavnath Yatrotsavaesakal

सिन्नर (जि. नाशिक) : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसिय यात्रोत्सवानिमित्त बुधवारी (ता. ५) सकाळपासून भैरवनाथ महाराज मुखवट्याच्या रथाची व कावडींची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. (Bhairavnath Yatrotsav started Sinnar from 5 april nashik news)

या मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते.

दरम्यान, यात्रोत्सवाच्या निमित्ताने सिन्नरवासियांना सिन्नर भूषण स्व. त्र्यंबकबाबा भगत यांची उणीव प्रत्येक ठिकाणी वाटत होती. बुधवारी सकाळी सहाला माजी नगरसेवक मनोज भगत यांच्या हस्ते मंदिरात आरती व भगत कुटुंबियांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशाच्या निनादात व टाळ मृदंगाच्या गजरात रथ मिरवणुकीस सुरवात झाली.

नाशिक वेस, गंगा वेस, खडकपुरा, लाल चौक, महालक्ष्मी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस, लोंढे गल्लीतून गावठा, तानाजी चौक, गणेश पेठ, शिंपी गल्ली अशा शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवरून रथ व कावडींची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी दर्शनासाठी अबालवृद्धांसह महिला व भाविकांची झुंबड उडाली होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Bhairavnath Yatrotsava
BJP News : भाजप शहराध्यक्षाची 15 एप्रिलपर्यंत होणार घोषणा

दिवसभर लगबग

स्व. सिन्नरभूषण त्र्यंबकबाबा भगत यांच्या आशीर्वादाने विलास महाराज भगत यांच्यासह भैरवनाथ वारकरी भजनी मंडळाची दिंडी काढण्यात आली. पाचोरे घराण्याकडे रथ हाकण्याचा मान होता. रथावर भालदार-चोपदार देवाच्या मूर्तीस चौराने वारा घालीत होते. बैलाचा खांदा रथाच्या जोत्याला लावून रथ ओढण्यासाठी शेतकऱ्यांची दिवसभर धावपळ सुरू होती. रथाच्या जोखडावर घरोघरी नारळ वाढविले जात होते.

घरोघरी आलेले पाहुणे आणि मित्रांच्या स्रेहभेटींनी जणू आनंदाची पर्वणी असल्याचा भास होत होता. त्यास लाभलेल्या भक्तीच्या कोंदणात सिन्नर नगरीतील रस्तेही रांगोळ्यांनी सजले होते. चौकाचौकात आबालवृद्धांच्या ओेसंडत्या उत्साहाने तरुण मंडळांनी कावडीधारकांसाठी अल्पोपहार, सरबताची व्यवस्था केली होती. रथामागे असलेल्या कावडीधारकांचे पद प्रक्षालन व प्रसाद वाटपासाठीही मोठी गर्दी होती.

कावडीधारकांनी केले प्रबोधन

रथ मिरवणुकीत अनेक कावडीधारकांचा सहभाग होता. या कावडीधारकांची मनोभावे पूजा केली जात होती. काही कावडीधारकांनी खांद्यावर कावडीसह विविध फलक घेत त्याद्वारे प्रबोधनाचा प्रयत्न केला.

Bhairavnath Yatrotsava
NDCC Bank Recovery : जप्त वाहनांच्या लिलावाचा मार्ग खुला; न्यायालयाने स्थगिती उठवली

सरस्वती नदी स्वच्छता अभियान, पर्यावरण वाचवा, स्वच्छ सिन्नर- सुंदर सिन्नर आदी प्रबोधनात्मक फलक दिसून आले. वर्षानुवर्षे सरस्वती नदीकडे दुर्लक्ष केल्याने तिचे अस्तित्व संपत असल्याची खंत या फलकांद्वारे व्यक्त करण्यात आली.

बारा तास मिरवणुक

भैरवनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त सकाळी सहापासून सुरू झालेली रथ व कावडी मिरवणूक सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहते. जवळपास १२ तास सुरू असलेल्या मिरवणुकीत कावडीधारक दिवसभर रथाच्या मागोमाग चालतात.

रणरणत्या उन्हातही कावडीधारकांत उत्साह कायम होता. परिसरातील शेतकरी बैलांना घेऊन येत होते. भर उन्हातही रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी सातला रथ मंदिरात आल्यानंतर कावडीधारकांनी डीजेच्या तालावर नाचत, दिवसभराचा थकवा काढला.

Bhairavnath Yatrotsava
Market Committee Election : प्रभावी युक्तीवादानंतरही पिंपळगांवला 15 अर्ज बाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com