Bharat Dighole : नाफेडकडून कांदा खरेदी सुरू होणे आवश्यक : भारत दिघोळे

Bharati Dighole
Bharati Digholeesakal

Bharat Dighole : नाफेडकडून १५ मेपासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू केली जाईल यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्र दिले होते.

प्रत्यक्षात मात्र नाफेडकडून अजूनही महाराष्ट्रात कुठेही कांदा खरेदी सुरू झालेली नसून नाफेडची प्रत्यक्ष कांदा खरेदी व्हावी याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. (Bharat Dighole statement Onion purchase from NAFED must start nashik news)

नाफेड कांदा खरेदीबाबत अजून कोणतीही स्पष्टता नसून बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी दोन रुपयांपासून सहा रुपये प्रति किलोचा निच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल प्रचंड संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत.

याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सरकार दरबारी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर स्वतः केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी एप्रिल महिन्यातच नाफेडकडून यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केली जाईल असे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते.

स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी नाफेड कांदा खरेदीबाबत घोषणा करूनही प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू होत नाही हे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासारखे आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नये.

अतिवृष्टी, गारपीट अवकाळी पावसामुळे राज्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bharati Dighole
Teacher News: थकीत बिले देता का बिले... गुरुजींचे अडकले 64 कोटी! जिल्ह्यातील शिक्षकांना हक्काचे पैसे मिळेना

अशा परिस्थितीमध्ये नाफेडकडून कांदा खरेदी सुरू होणे अत्यंत गरजेचे असून नाफेडने ही कांदा खरेदी थेट बाजार समितीमध्ये उतरून करावी. व्यापारी खरेदी व नाफेडच्या खरेदीमध्ये स्पर्धात्मक लिलाव होऊन शेतकऱ्यांना अधिकचा दर कसा मिळेल यासाठी भारती पवार यांनी प्रयत्न करावे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला असून सध्या कांद्याला मिळणाऱ्या दरामध्ये शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

तत्काळ शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी सुरू न झाल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना घेराव घातला जाईल असा इशारा श्री. दिघोळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Bharati Dighole
Unseasonal Rain Damage: पिकांच्या नुकसानीमुळे कर्ज भरणार कसे? शेतकऱ्यांचा सवाल; शेतकरी संघटना आक्रमक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com