‘भाऊबीज पहाट’ मैफिल रंगली

‘भाऊबीज पहाट’ मैफिल रंगली
Published on: 
NSK26H34869 जळगाव : महाबळ परिसरातील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात भाऊबीजेला रंगलेल्या मैफिलीत सादरीकरण करताना कलावंत. ----- ‘भाऊबीज पहाट’ मैफिलीत रसिकांनी घेतला सुरांचा आनंद उपशीर्षक महाबळमधील विठ्ठल मंदिरात रंगली मैफिल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : जलसंपदा विभागातील सहकारी योगेश जोशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे यशस्वी दुसरे पर्व ‘भाऊबीज पहाट’ हा सांस्कृतिक आणि सांगीतिक कार्यक्रम उत्साहात आणि आनंददायी वातावरणात श्री विठ्ठल मंदिर, महाबळ परिसर येथे झाला. दिवाळी आणि भाऊबीजेच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमाला शहरातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन खासदार स्मिता वाघ, निवृत्त अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील प्रा. शरच्चंद्र छापेकर, अनिल राव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ कलावंत राजेश पुराणिक, अशोक अहिरे रवींद्र माळी, दुष्यंत जोशी, नीलकंठ कासार आदी उपस्थित होते. सांगीतिक मैफिलीत गायिका रेणुका जोशी व बालगायक चि. राम पुष्पराज चौधरी यांनी भावगीते, भक्तिगीते, नाट्यसंगीत आणि दिवाळीची बहारदार गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना तबलावदक राहुल कासार, हार्मोनियमवर मकरंद देशमुख यांनी साथ दिली. प्राची चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.