भाऊबीज पहाट कार्यक्रमात सुरांची मैफल रसिकांनी घेतला भावगीते, भक्तिगीते आणि नाट्यसंगीताचा आनंद

भाऊबीज पहाट कार्यक्रमात सुरांची मैफल
रसिकांनी घेतला भावगीते, भक्तिगीते आणि नाट्यसंगीताचा आनंद
Published on: 
NSK26H34861 जळगाव : भाऊबीज पहाट’ कार्यक्रमात गायिका रेणुका जोशी व बालगायक राम पुष्पराज चौधरी यांनी सुरेल गीतांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित मान्यवर व रसिक भाऊबीज पहाट कार्यक्रमात सुरांची मैफल रसिकांनी घेतला भावगीते, भक्तिगीते आणि नाट्यसंगीताचा आनंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : दिवाळी आणि भाऊबीजेचे औचित्य साधून जलसंपदा विभागातील योगेश जोशी यांच्या वतीने आयोजित ‘भाऊबीज पहाट’ या सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाचे दुसरे पर्व उत्साहात पार पडले. महाबळ परिसरातील श्री विठ्ठल मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरेल गीतांच्या सादरीकरणामुळे पहाटेचे वातावरण संगीतमय झाले. बुधवारी (ता. ११) सकाळी सातला कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ, जलसंपदा विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता तथा माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील, शरदचंद्र छापेकर, प्राचार्य अनिल राव, ज्येष्ठ संगीत कलावंत राजेश पुराणिक, निवृत्त कार्यकारी अभियंता अशोक आत्माराम अहिरे आणि विठ्ठल मंदिराचे संस्थापक रवींद्र कोळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी दुष्यंत जोशी, नीलकंठ कासार आदी उपस्थित होते. सांगीतिक मैफलीत गायिका रेणुका योगेश जोशी आणि बालगायक राम पुष्पराज चौधरी यांनी भावगीते, भक्तिगीते, नाट्यसंगीत तसेच दिवाळीची बहारदार गीते सादर केली. त्यांच्या सुरेल गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. तबलावादक राहुल कासार यांनी तालाची साथ दिली. हार्मोनियम वादनासह अन्य वाद्यांच्या साथीने मैफलीत रंगत आली. दिवाळीच्या आनंदात संगीताची मेजवानी देणाऱ्या या उपक्रमामुळे उपस्थित रसिकांना प्रसन्न सकाळी सुरांचा आनंद घेता आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.