नाशिक: भावली धरणाचे पाणी ठाणे जिल्ह्यातील ९७ गावांना मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याप्रश्नी सात वर्षांपासून सुरू असलेला लढा संपुष्टात आला असून, शहापूर तालुक्यातील ९७ गावांना हे पाणी देण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला. दरम्यान, या निर्णयाविरोधात याचिकाकर्ते उच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात असून, आमच्या हक्काचे पाणी सोडू नये म्हणून इगतपुरी तालुक्यातून वारंवार या निर्णयासाठी विरोध झाला. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.