इगतपुरी : विजय पगारे : नवसाला पावणाऱ्या भवानी मातेच्या दर्शनासाठी आदीवासी भागातील मोडाळ्यात भाविकांची मांदीयाळी : ६० ते ७० हजार भाविकांची उपस्थिती :

इगतपुरी : विजय पगारे : नवसाला पावणाऱ्या भवानी मातेच्या दर्शनासाठी आदीवासी भागातील मोडाळ्यात भाविकांची मांदीयाळी : ६० ते ७० हजार भाविकांची उपस्थिती :
Published on: 
IGT26B08825 मोडाळे : येथील नवसाला पावणाऱ्या भवानी मातेची फुलांनी सजवलेली मनमोहक मूर्ती. (छायाचित्रे : विजय पगारे, इगतपुरी) ---------------- ३०-२ सोन्या चांदीऐवजी फुलांच्या अलंकारांनी सजविण्याची प्रथा मोडाळेच्या भवानीमातेच्या दर्शनासाठी गर्दी सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.१९ : इगतपुरी तालुक्यात दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या मोडाळेत किष्किंधानगरी असून त्याच बाजूला डोंगरवर नवसाला पावणाऱ्या भवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी म्हणून आदिवासी बांधवांची येथे सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गेल्या दोन दिवसात जवळपास ६० ते ७० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. दरम्यान सोन्या-चांदीऐवजी फुलांच्या अलंकारांनी सजविण्याची येथील अनोखी प्रथा आहे. ---------- मंदिर पूर्वाभिमुख असून, आतून बाहेरून रंगरंगोटी केली आहेत. मंदिरासमोर यज्ञकुंड आहे. या देवीचे विशेष म्हणजे तिला सोन्या-चांदीच्या अलंकारांऐवजी फुलांच्या अलंकारांनी सजविण्याची प्रथा आहे. नवरात्रातील नवव्या माळेला देवीला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या भागात असणाऱ्या विविध जंगली फुलमाळांची आरास करतात. देवीच्या मंदिर परिसरातून बाजूला वैतरणा धरण व मुकणे धरणाचा वेढा आहे. देवीभक्तांनी येथे खोल्या बांधून दिल्या आहेत. नवव्या माळेला विजयादशमीला गर्दीचा उच्चांक असतो. देवस्थान ट्रस्टतर्फे नवरात्रोत्सव काळात हरिपाठ, श्री भागवत कथा, कीर्तन, भारुड, भगवतीचा गोंधळ व देवीच्या आरतीचे नियोजन करण्यात आले आहे. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

इगतपुरी : विजय पगारे : शिखरस्वामिनी कळसुबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी :  नाशिक - नगर जिल्हयासह राज्यभरातील भाविकांचा ओघ :
इगतपुरी : विजय पगारे : सातव्या माळेचा मुहुर्त साधत घाटनदेवीच्या दर्शनासाठी उसळला जनसागर :
इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरीच्या विविध भागात विजेचा वारंवार लपंडाव : नागरिक हैराण : शेतकरी बेजार ! वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणे बिघडण्याची भीती : कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी :
भिमशक्तीच्या येवला तालुकाध्यक्षपदी विजय घोडेराव; शहराध्यक्षपदी अजहर शेख कार्यकारिणी जाहीर; सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचे महेंद्र पगारे यांचे आवाहन
Marathi News Esakal
www.esakal.com