मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून मराठी भावगीतांचा सुरेल आविष्कार..! गायक प्रथमेश लघाटे, शमिका भिडे यांच्या भावगीतांनी येवलेकर मंत्रमुग्ध

मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून मराठी भावगीतांचा सुरेल आविष्कार..! गायक प्रथमेश लघाटे, शमिका भिडे यांच्या भावगीतांनी येवलेकर मंत्रमुग्ध
Published on: 
27329, 27327 येवला : भावगीते गाताना गायक प्रथमेश लघाटे, शमिका भिडे. समोर उपस्थित श्रोते, मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ आदी ‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून मराठी भावगीतांचा सुरेल आविष्कार सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २६ : मराठी भावगीतांची समृद्ध परंपरा, भक्तिसंगीताचा भावस्पर्शी अनुभव आणि सुरेल गायनाची अविस्मरणीय मैफल अशा संगीतमय वातावरणात येथील रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. गायक प्रथमेश लघाटे आणि शमिका भिडे यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेल्या ‘मर्मबंधातील ठेव’ या भावगीतांच्या कार्यक्रमाला येवलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गीत-संगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या कार्यक्रमामुळे महात्मा फुले नाट्यगृहात सांगीतिक आनंदाची अनुभूती अनुभवायला मिळाली. यावेळी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ आणि देविशा भुजबळ उपस्थित होते. लघाटे आणि भिडे यांनी आपल्या सुमधुर आवाजातून विविध गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. भक्तिसंगीतातील आर्तता, भावगीतांमधील भावपूर्णता आणि स्वरांमधील माधुर्य यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला. गीतांच्या सुरेल सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या गीतांमधून व्यक्त होणाऱ्या भावना, शब्दांचे सौंदर्य आणि स्वरांची जादू यांचा अनुभव ‘मर्मबंधातील ठेव’ या कार्यक्रमातून रसिकांना घेता आला. कार्यक्रमाला माजी आमदार मारोतीराव पवार,ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,माजी सभापती संभाजी पवार,अध्यक्ष वसंत पवार, भाऊसाहेब भवर, साहेबराव मढवई, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी,दत्ता निकम, मोहन शेलार, संजय बनकर, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, सचिन कळमकर, सुहास भांबारे, समाधान जेजुरकर, रतन बोरनारे, नवनाथ काळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com