शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षक दांपत्याची अनोखी '' दिवाळी ''

शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षक दांपत्याची अनोखी '' दिवाळी ''
Published on: 
(पान ४ ला मेन) MSI26B09832 भिलाईपाडा (ता. नंदुरबार) : खासगी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी फराळाचे पदार्थ तयार करताना मुख्याध्यापक संतोष नांद्रे, शिक्षिका वृक्षाली नांद्रे. --------------------- भिलाईपाडा विद्यार्थ्यांसोबत अनोखी ‘दिवाळी’ पदरमोड करीत शाळेतच फराळाच्या पदार्थांची निर्मिती सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. ६ : अलिकडे प्रत्येक शाळेत सण- उत्सव साजरा करण्याची प्रथा पुढे येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक सुप्त कला- गुणांना वाव मिळत असल्याचे चित्र आहे. भिलाईपाडा (ता. नंदुरबार) येथील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक दांपत्य गेल्या दहा वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना सोबत घेत दिवाळी साजरी करत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. पदरमोड करत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शाळेतच फराळाचे पदार्थ तयार करत विद्यार्थ्यांची ‘दिवाळी गोड’ करत आहेत. शाळेत केवळ शैक्षणिक ज्ञान न देता विद्यार्थ्यांना अनेक सामाजिक गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी शिक्षक दांपत्याची धडपड असते. भिलाईपाडा (ता. नंदुरबार) येथील खासगी प्राथमिक शाळेत दिवाळीचा उत्सव दरवर्षी अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. शाळेची पटसंख्या ७५ असून, शाळेत शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावातील सांस्कृतिक परंपरेसह प्रत्येक सण उत्सवात विद्यार्थ्यांना वेगवेगळी मेजवानी दिली जाते. मुख्याध्यापक संतोष यशवंत नांद्रे, शिक्षिका वृषाली संतोष नांद्रे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार दिवाळीनिमित्त वेगवेगळे फराळाचे पदार्थ शाळेतच विद्यार्थ्यांसमवेत तयार करून घेतात. विशेष म्हणजे शालेय अभ्यासक्रमात कोणताही खंड पडू न देता विद्यार्थ्यी सहभागी होतात. कार्यशिक्षणाचे, स्वावलंबनाचे, सहकार्याचे व एकतेचे धडेही यानिमित्ताने विद्यार्थ्यांना दिले जातात. यंदा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शाळेत शेवचिवडा, मोहनथाळ व बर्फी दिवाळीचा फराळ तयार करण्यात आला. प्रति विद्यार्थ्यांस दोनशे पन्नास ग्रॅम फराळ वाटप करण्यात आला. शाळेत स्वयंपाकीण ताईंना दिवाळीनिमित्त साडी चोळीची भेट दिली जाते. -------------------- आकाश कंदीलसह सडा, रांगोळीचे धडे यंदा प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी शाळेत सडा रांगोळी काढून विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील लावून शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला. दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रत्येक सण- उत्सवाचे महत्व समजावून सांगितले जाते. शिवाय पर्यावरण पूरक गणेशोत्सव, दिवाळीत सडा रांगोळीसह आकाश कंदील, पणत्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पोषण आहारात सर्वप्रकारच्या भाजीपाल्याचा समावेश करत व्हेज पुलाव, मध्यान्ह भोजनानंतर दिपोत्सवाचे महत्व समजावून प्रदूषणमुक्त दिवाळी, व्यसनमुक्त दिवाळीची शपथ विद्यार्थ्यांना दिली जाते. शिवाय दिवाळीच्या अभ्यासासाठी पदरमोड करत लेखन साहित्य पुरवले जाते. शाळेतील प्रत्येक विध्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा शाळेतच साजरा केला जातो. औक्षण करून लेखन साहित्य भेट देऊन प्रेरणा दिली जाते. शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या पावभाजीची मेजवानी दिली जाते. सरपंच, सर्व सदस्य, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील, केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी यांनी या उपक्रमाचे नेहमीच कौतुक केले. ---------------- शाळा, विद्यार्थी आमच्यासाठी कुटुंबच आहे. शाळेत विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद वेगळाच असतो. शिवाय काही तरी वेगळे केल्याचेही समाधान असते. चिमुकल्यासोबत दिवाळी साजरी करताना मनही समाधानी असते. - संतोष नांद्रे, मुख्याध्यापक, खासगी प्राथमिक शाळा, भिलाईपाडा (ता. नंदुरबार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.