भिमशक्तीच्या येवला तालुकाध्यक्षपदी विजय घोडेराव; शहराध्यक्षपदी अजहर शेख कार्यकारिणी जाहीर; सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचे महेंद्र पगारे यांचे आवाहन

भिमशक्तीच्या येवला तालुकाध्यक्षपदी विजय घोडेराव; शहराध्यक्षपदी अजहर शेख कार्यकारिणी जाहीर; सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचे महेंद्र पगारे यांचे आवाहन
Published on: 
फ़ोटो- 27005 येवला : भीमशक्तीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे, कार्याध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे आदी. भीमशक्ती येवला तालुकाध्यक्षपदी विजय घोडेराव यांची निवड सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ झालेल्या भीमशक्तीच्या बैठकीत तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर झाली. भीमशक्तीच्या तालुकाध्यक्षपदी विजय घोडेराव, तर शहराध्यक्षपदी अजहर शेख यांची निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांसह अन्याय-अत्याचाराविरोधात प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केले. प्रारंभी जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे व भीमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे यांनी प्रतिमापूजन केले. तालुका व शहरात भीमशक्तीची संघटनात्मक ताकद उभी करावी, असे आवाहन महेंद्र पगारे यांनी केले. जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे यांनीही मनोगत व्यक्त केले. उर्वरित कार्यकारिणी अशी ः तालुका कार्याध्यक्ष- बाळासाहेब आहिरे, तालुका उपाध्यक्ष- विनोद त्रिभुवन, कायदेविषयक सल्लागार- ॲड. अनिल झाल्टे, सरचिटणीस- मयूर सोनवणे, सचिव- विधाता आहिरे, सहचिटणीस- बाळासाहेब सोनवणे, संघटकपदी- विजय पगारे, गणेश झाल्टे, प्रशांत वाघ, समाधान गुंजाळ व दादासाहेब मोरे. येवला उपाध्यक्षपदी सुरेश खळे, सरचिटणीसपदी इलियाज पठाण, सचिवपदी आकाश घोडेराव, तर संघटकपदी कुरेशी व गुड्डभाई शेख यांची निवड झाली. हैदर अन्सारी, मंगेश गायकवाड, बाळासाहेब आहिरे, मनोहर आहिरे, युवराज पगारे, आशा आहेर, सुंनदा काळे, ज्योती पगारे, अलका घोडेराव, सविता आहिरे,सुजाता पगारे आदी उपस्थित होते. बाळासाहेब आहिरे यांनी सूत्रसंचालन केले. आशा आहेर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com