Dahihandi Utsav: 5 थर लावत ‘भोईराज’ गोविंदांनी फोडली हंडी! राणेनगरला दहीहंडी उत्सव

Bhoiraj Govinda team breaking Dahi Handi organized by Shiv Sena Thackeray group.
Bhoiraj Govinda team breaking Dahi Handi organized by Shiv Sena Thackeray group.esakal

Dahihandi Utsav : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे’ यांच्या जयघोषाच्या घोषणांसोबत शिवाज्ञा प्रतिष्ठानच्या रणवाद्य ढोल पथकाच्या आणि परिसरातील बालकांच्या बहारदार नृत्याविष्काराने राणेनगर येथे शिवसेना ठाकरे गटातर्फे आयोजित दहीहंडी उत्सव पार पडला.

तब्बल पाच थर लावत भोईराज गोविंदा पथकाच्या गोविंदांनी दहीहंडी फोडत ५१ हजारांचे बक्षीस जिंकले आणि उपस्थित असलेल्या शेकडो प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या गोविंदाचे कौतुक केले. (Bhoiraj Govinda broke handi by applying 5 layers Dahihandi festival in Ranenagar Nashik)

इंदिरानगर, राजीवनगर, पांडवनगरी, विनयनगर, पाथर्डी, सिडको आदी भागातून मोठ्या संख्येने जमलेल्या प्रेक्षकांनी येथे हजेरी लावली.

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हा प्रमुख देवानंद बिरारी, अजय बागूल, उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट, डॉ. विशाल जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दहीहंडी उत्सवाचे आयोजक तथा हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख सागर देशमुख आणि विभागप्रमुख विनोद दळवी आणि डॉ. पल्लवी जाधव यांनी स्वागत केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bhoiraj Govinda team breaking Dahi Handi organized by Shiv Sena Thackeray group.
Sangli Dahihandi: ‘अप्सरा’ची अदा, मिरजकर फिदा',भाजप-जनसुराज्य महायुती दहीहंडीचा दिमाखदार सोहळा

तत्पूर्वी राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या सौरभ बास्केटबॉल ॲकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. भोईर पथकाचे निखिल सासे, भारत डांगरे आणि ढोल पथकाचे हर्षल फुलदेवरे, रोहित गायधनी यांचा सत्कार जाला.

पूजा देशमुख आणि वैशाली दळवी यांनी आभार मानले. रवींद्र पाटील, महेश चव्हाण, कौस्तुभ दळवी, दीपक पंडित, आकाश कदम, किरण शिंदे, संदीप सोनवणे, आशिष पवार, मयूर आवटे, जिग्नेश डोमाळे, अप्पा डोमाळे आदींनी संयोजन केले.

Bhoiraj Govinda team breaking Dahi Handi organized by Shiv Sena Thackeray group.
Kolhapur Dahihandi : गडहिंग्लजच्या नेताजी पालकर पथकानं 8 थर लावून फोडली महाडिक युवा शक्तीची 3 लाखांची दहीहांडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com