भोकणीला समृध्द पंचायतराजचे सन्मानपत्र

भोकणीला समृध्द पंचायतराजचे सन्मानपत्र
Published on: 
(टीप – सदरची बातमी जाहिरातदार व्यक्तीची आहे. कृपया फोटोसह प्रसिध्द करावी ही विनंती) फोटो-23415 सिन्नर ः समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत भोकणीचे सरपंच अरुण वाघ, ग्रामपंचायत अधिकारी योगेश राहणे यांना सन्मानपत्र देताना. समृद्ध पंचायतराजचे भोकणीला सन्मानपत्र सिन्नर ः गावविकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न, लोकसहभागातून राबवलेले उपक्रम आणि विकासकामांतील प्रशासकीय समन्वयाची दखल घेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत भोकणीचे सरपंच अरुण वाघ, ग्रामपंचायत अधिकारी योगेश राहणे यांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले. नाशिक येथे हा सन्मान सोहळा झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडवळ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, व्यावसायिक सोमनाथ सांगळे, कांताराम कुर्हाेडे आदी उपस्थित होते. पारंपरिक कामांसह नावीन्यपूर्ण उपक्रम, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि स्थानिक विकासाच्या विविध संधींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न वाघ, राहाणे यांनी केला आहे. सरपंच अरुण वाघ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विकासकामांत सातत्य राखताना गावाचा सर्वांगीण प्रगतीचा दृष्टिकोन जपला आहे. ग्रामपंचायतीला तालुका ते राज्यस्तरापर्यंत विविध उपक्रमांतर्गत जे पुरस्कार मिळाले आहेत. त्या कामांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. ..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.