जप्त मुद्देमालात दोन किलो सोन्याची वाढ

जप्त मुद्देमालात दोन किलो सोन्याची वाढ
Published on: 
भोकर स्टेट बँक दरोडा (लोगो) --- पोलिसांच्या जप्त मुद्देमालात दोन किलो सोन्याची वाढ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : भोकर येथील स्टेट बँकेतून सोने आणि रोकड लुटत असताना, दरोडेखोरांनी बँकेतील अधिकाऱ्यांना येथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, अशी विचारणा केली. बँकेतील अधिकाऱ्यांनी अर्धा तास लागत असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तालुका पोलिस घटनास्थळी केवळ १७ मिनिटांतच पोहोचले. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक शरद जासक याच्यासह चौघांनी ३१ ऑक्टोबरला भोकर स्टेट बँक शाखेत भरदिवसा दरोडा टाकून २७ किलो सोने आणि १२ लाख २६ हजार रुपयांची रोकड, असा एकूण ३६ कोटी ४८ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान, पोलिसपाटील ग्रुपवरील अपडेट्‌स, ग्रामस्थांची धावपळ, दरोडेखोरांचा पाठलाग या संयुक्त प्रयत्नाने कोट्यवधीची यशस्वी लूट करूनही दरोडेखोरांचा कट फसला. दरम्यान, बँकेतून तारण ठेवलेले सोने दरोडेखोरांनी लुटून नेल्यानंतर पोलिसांनी तो मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला २७ किलो सोने लुटून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्याच्या मोजणीत दोन किलो सोने वाढल्याचे पोलिसांच्या तपासणीत समोर आले असल्याने दरोड्याच्या जप्त मुद्देमाल कोशागार विभागात ठेवण्यात आला.