३६ कोटी ४८ लाखांचा ऐवज ''सहिसलामत''

३६ कोटी ४८ लाखांचा ऐवज ''सहिसलामत''
Published on: 
भोकर स्टेट बँक दरोडा प्रकरण (लोगो) --- NSK26H34258, NSK26H34257 भोकर (ता. जळगाव) : स्टेट बँकेत गोळीबार झालेल्या ठिकाणची पाहणी करताना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व न्यायवैद्यक तज्ज्ञ. दुसऱ्या छायाचित्रात दरोडेखोरांकडून जप्त मुद्देमाल, दोन पिस्तूल. ---- शीर्षक दरोड्यातील ३६ कोटी ४८ लाखांचा ऐवज सुरक्षित --- उपनिरीक्षक जासकचा डाव फसला; ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांची कारवाई सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : तालुक्यातील स्टेट बँकेच्या भोकर शाखेवर शनिवारी (ता. ३१) दुपारी गोळीबार करीत चार दरोडेखोरांनी ३६ कोटी ४८ लाखांचा ऐवज लुटला होता. पोलिसांची तत्परता आणि चार गावांतील ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षकांनी रोड्याचा थरारक घटनाक्रम आणि संशयितांची पार्श्वभूमी सांगितली. दरोड्यातील ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, त्यात सुमारे २७ किलो सोने आणि १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली, तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी (टीएस १३, ईआर ५५५४), आणि (एमएच ४१, बीवाय ६१२१) वाहन ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांनी बँकेत गोळीबार करून कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली होती. शनिवारी (ता. ३१) दुपारी पावणेतीन ते सव्वातीनदरम्यान दोन दुचाकींवरून चार हेल्मेटधारी तरुण बँकेत आले. एकाने एअरगनने सुरक्षारक्षकाच्या पायावर गोळी झाडली. आवाजाने कर्मचारी घाबरले. चौघांकडे बंदूक, चाकू आणि लाकडी दांडा होता. त्यांनी शाखा व्यवस्थापक जयेश राणे, रोखपाल रणजित मराठे, लिपिक ऋषिकेश भगत, सुरक्षारक्षक संदीप कोळी, शिपाई समाधान वराडे, एफओएस सुनील शिरसाठ आणि शिपाई रघुनाथ ठाकरे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून ओलीस धरले. प्रतिकार करू नये, म्हणून कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. गोळी झाडून लूट बँकेचे सुरक्षारक्षक संदीप कोळी यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करण्यापूर्वीच म्होरक्या तथा बडतर्फ उपनिरीक्षक शंकर जासक याने बंदुकीतून गोळी झाडली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता व्यवस्थापकाला पिस्तूल लावून बँकेच्या स्ट्राँग रूममध्ये नेले. लॉकरमधून तारण ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड बॅगांमध्ये भरून व्यवस्थापक व रोखपालाना खुर्चीला बांधून दरोडेखोर बँकेबाहेर पडले. अटकेतील चौघांपैकी बडतर्फ उपनिरीक्षकासह तिघे सराईत गुन्हेगार आहेत. अंकुश तुळशीराम पवार- चव्हाण (वय २५, रा. खापरखेडा, ता. खकनार, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश) याच्यावर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात २०२३ मध्ये जामनेर दरोडा, आम्सॲक्टसह इतर गुन्हे दाखल आहेत. गजानन राजेंद्र पवार (३२, न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याने चाळीसगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुलत भावाचा खून करून मृतदेह फेकून दिला होता. या गुन्ह्यात कारागृहातून दीड महिन्यापूर्वी तो बाहेर आला होता. रायगडला उपनिरीक्षक असलेला शंकर रमेश जासक, (४२, मन्यारखेडा, ता. जळगाव) याला २०१८ मध्ये लाच घेतल्याप्रकरणी अटक होऊन त्याचे निलंबन झाले होते. निलंबन काळात त्याने रजा घेऊन १ जून २०२३ ला जळगावच्या कालिंकामाता मंदिर चौकातील स्टेट बँक शाखेत शालक, वडिलांसह दरोडा टाकला. त्या गुन्ह्यात तो कारागृहातून सहा महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला आहे. अंकुश श्रावण चव्हाण (३०, रामदेववाडी, ता. जळगाव) तिघांचा साथीदार आहे. चौकट संशयितांना पोलिस कोठडी दरोडेखोरांनी बँकेतून १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड, २७ किलो सोन्याचे दागिने लुटले. निव्वळ सोन्याचे मूल्य ३६ कोटी ३६ लाख २३ हजार रुपये असल्याचे बँकेने अहवालात नमूद केले आहे. संशयितांना रविवारी (ता. १) न्यायालयात हजर केले. न्यायाधीश निकम यांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ग्रामस्थांचा सत्कार दरोडेखोरांचा पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांचा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सत्कार केला, तसेच शोध कार्यात सहभागी सर्व पेोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिवॉर्डही घोषित केले. दराेड्यातील संपूर्ण रक्कम रिकव्हर झाल्याने स्टेट बॅँकेतर्फे उपमहा प्रबंधक प्रवीर कुमार यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.