
येवला (जि. नाशिक) : कोरोनाबाधित व कोरोनातून (Coronavirus) मुक्त झालेल्या रुग्णांनी म्युकरमायकोसिस (mucormycosis) या आजारापासून स्वत:ची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले. येथील विश्रामगृहावर कोरोना सद्यःस्थिती, उपाययोजना व लसीकरण मोहीम याबाबत निफाड व येवला तालुक्यांतील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. (Bhujbal appealed to the patients to take more care of themselves from mucormycosis)
भुजबळ म्हणाले, की तालुक्यात कान, नाक व घसातज्ज्ञ नसल्याने म्युकरमायकोसिसचे बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने नाशिकला उपचारासाठी पाठविण्यात यावे. या आजारावर उपाययोजनेसाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच, ऑक्सिजनवर जे रुग्ण आहेत अथवा ज्या रुग्णांनी ऑक्सिजनवर उपचार घेतले आहेत, अशा रुग्णांची नियमित तपासणी करण्यात यावी. ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू झाल्यानंतर ऑक्सिजनच्या तुटवड्याचे प्रमाण कमी होणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
रुग्णसंख्या घटल्याने लॉकडाउनचा चांगला परिणाम दिसून येत असून, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. पालिकेने पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. दरम्यान, शहरात शनिपटांगण व परिसरातील लॉकडाउनचीही त्यांनी पाहणी केली. तसेच, विंचूर येथील देवकी लॉन्स येथे उभारण्यात आलेल्या ५० बेडच्या कोविड केअर सेंटरचे उदघाटनही त्यांच्या हस्ते झाले. बैठकीस पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकाडे, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख, संदीप कराड, पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलिस निरीक्षक संदीप कोळी, लासलगावचे उपनिरीक्षक राहुल वाघ आदी उपस्थित होते.
(Bhujbal appealed to the patients to take more care of themselves from mucormycosis)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.