नाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक अडचणीत टाकणाऱ्यांचीच मुले आता बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. बँक अजूनही पूर्णतः अडचणीतून बाहेर आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी जिल्हा बँकेची निवडणूक घेऊ नये, असे माझे ठाम मत असून, याबाबत मी राज्य सरकारला कळविले आहे, अशी माहिती त्यांनी शनिवारी (ता. १२) माध्यमांशी बोलताना दिली.