भुसावळात नाल्यात आढळला मृतदेह

भुसावळात नाल्यात आढळला मृतदेह
Published on: 
भुसावळ येथे नाल्यात आढळला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. १७ : शहरातील वरणगाव रोडवरील एलपीजी पंपाजवळ एका ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता.१७) ही घटना उघडकीस आल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीला परिसरातील नागरिक ‘अय्या’ या नावाने हाक मारत असत. तो भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याचा मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला?, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मृत्यू अपघाती आहे की? यामागे अन्य काही कारण आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मृत व्यक्तीची ओळख, मृत्यूचे नेमके कारण व घटनेमागील परिस्थिती याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच पुढील तपशील स्पष्ट होणार आहे. चौकट तीन मृतदेह आढळल्याने चिंता भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड महिन्यात एक खून, तर तीन ठिकाणी मृतदेह आढळून आल्याच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com