ॲंकर
भुसावळ परिसर पानासाठी
--------------------
BSW26B12211 व BSW26B12212
भुसावळ : ‘आयएमए’च्या दिवाळी पहाट कार्यक्रमात बासरी वादन करताना डॉ. प्रमोद चौधरी व गायन करताना डॉ. मनीषा दावलभक.
-------------
सुमधुर संगीत स्वरांनी रंगली ‘दिवाळी पहाट’
----
भुसावळला डाक्टरांचे वादन-गायन; ‘आयएमए’च्या स्थानिक शाखेतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ७ : ‘भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रोपदीसी बंधु शोभे नारायण...’ अशा एकापेक्षा एक सरस भावगीत व भक्तीगिते गात येथील डॉक्टरांनी दिवाळी साजरी केली. ‘आयएमए’च्या स्थानिक शाखेतर्फे धन्वंतरी पुजन व दिवाळी पहाट या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष होते. शहरातील अनेक डॉक्टर आपला व्यवसाय सांभाळून गायनाचा छंद जोपासतात. त्यांना यानिमित्ताने आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. धन्वंतरी जयंतीनिमित्त ‘आयएमए’च्या सभागृह परिसरात सुंदर रांगोळ्या काढून फुलांनी सजावट करण्यात आली होती.
सकाळी पावणेसातला दीप प्रज्वलन व भगवान श्री धन्वंतरी यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी डॉ. मंगेश खानापूरकर, डॉ. विकास कोळंबे, डॉ. नितीन दावलभक्त, आयएमएच्या भुसावळ शाखेच्या अध्यक्षा डॉ. शीतल चौधरी, मानद सचिव डॉ. महेंद्र चौधरी, मानद खजिनदार डॉ. पंकज राणे व डॅा. मनीषा दावलभक्त उपस्थित होते. त्यानंतर आयएमएचे सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांनी सादर केलेल्या भक्तिगीतांची व मराठी भावगीतांची सुरेल मैफल रंगली. एकूण ३० गाणी सादर करण्यात आली. यात धन्वंतरी स्तोत्र, गणेश वंदना, गणराज रंगी नाचतो, देहाची तिजोरी, गगन सदन तेजोमय, मन मोगरा, केशवा माधवा, भरजरी ग पितांबर यांसारख्या विविध भक्तिगीतांसह लोकप्रिय मराठी भावगीतांनी रसिकांची मने जिंकली.
अन् कार्यक्रमात आणली रंगत
प्रत्येक गायकाने गाण्यांची केलेली निवड, विविधतेने नटलेली सादरीकरणे व सादरकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व संगीतमय झाले होते. सूत्रसंचालकांनीही आपल्या सहजसुंदर निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांमधील गायनकलेला मंच मिळण्याबरोबरच परस्परांतील स्नेह व आपुलकी अधिक दृढ करणारा हा उपक्रम ठरला.या कार्यक्रमासाठी अध्यक्षा डॉ. शीतल चौधरी, मानद सचिव डॉ. महेंद्र चौधरी, मानद खजिनदार डॉ. पंकज राणे यांनी सर्व गायक, सूत्रसंचालक व सहभागी सदस्यांचे विशेष कौतुक केले. डॉ. दावलभक्त यांनी आभार मानले. ‘संगीत, भक्ती आणि एकत्रित सहभागातून निर्माण झालेल्या सुंदर आठवणी’ हे या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.