BSW26B12202
भुसावळ : दिव्यांना दिवाळीचे साहित्य वाटप करताना प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, स्वाती नाईक, रजनी सावकारे, लता होसकोटे, आरती चौधरी आदी.
----------------
भुसावळला दिव्यांग महिलांना
दिवाळीनिमित्त साहित्य वाटप
-------
स्नेहदीपचा ''माणुसकीची दिवाळी'' उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ६ : येथे खानदेश अंधकल्याण संघ संचलित स्नेहादीप निराधार अंध महिला संस्थेतर्फे रेल्वे सिनिअर इन्स्टिट्यूटमध्ये ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिव्यचक्षू बंधू-भगिनींची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने संस्थेतर्फे प्रत्येकाला रवा, तेल, तूप, मैदा, डाळी, साखर, गूळ, साबण आदी दिवाळीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सक्षम कौन्सिलिंगच्या संचालिका आरती चौधरी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे उपस्थित होत्या. आरती चौधरी म्हणाल्या की, आनंद हा वाटल्याने वाढतो. म्हणूनच आम्ही दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून आनंद वाटण्याचा प्रयत्न करतो व त्यातूनच आमची दिवाळी खऱ्याअर्थाने आनंदमय होते. चांगल्या कार्यासाठी नेहमीच मदतीचे हात पुढे येतात, याचा प्रत्यय आज पुन्हा आला. प्रमुख पाहुण्यांनी उदार मनाने मदतीची तयारी दर्शविली, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. कावेरी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वागतगीत दिव्यचक्षू संजय बडगुजर यांनी सादर केले. आनंदा कोल्हे, स्नेहादिप संस्थेच्या संचालिका स्वाती नाईक, लता होसकोटे, कावेरी चौधरी, जयश्री दवे, मंगला पाटील, जयश्री पाटील आदी महिला उपस्थित होत्या.