NSK26H32082, NSK26H32081
जळगाव : पाच संशयितांना शस्त्रास्त्रासह अटक करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक नितीन गणापुरे, निरीक्षक राहुल गायकवाड आदी. दुसऱ्या छायाचित्रात जप्त शस्त्रसाठा.
--------------
पाच संशयितांचे पासपाेर्ट
NSK26H32088
NSK26H32084
NSK26H32085
NSK26H32086
NSK26H32087
-----------
बारसे गँगच्या खात्म्याचा कट
भुसावळमध्ये पुन्हा ‘गँगवार’ची धग; संशयित बंटी पथरोडकडून पाच संशयितांना ३५ लाखांची सुपारी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : प्रतिस्पर्धी टोळीला संपविण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब संपविण्याचा इतिहास भुसावळमधील ‘गँगवार’चा राहिला आहे. असाच कट बंटी परशुराम पथरोड या टोळीप्रमुखाने आखल्याचे तपासात समोर आले आहे. यासाठी ३५ लाख रुपयांची खंडणी देऊन पाच संशयितांना सुपारी दिल्याचा उलगडा गुन्हे शाखेने केला आहे. कुसुंबा (जळगाव) येथे आश्रयाला असलेल्या पाच संशयितांना अटक केल्यानंतर या कटाचा उलगडा झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
नवरात्रोत्सवात भुसावळ येथील प्रस्थापित बारसे टोळीचाप्रमुख मिथुन मोहन बारसे, क्रिश संतोष बारसे, राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह मिळेल, त्याला संपवून टाकण्याचा कट संशयित बंटी पथरोडने आखला होता. पूर्ण तयारी झाली असतानाच गुन्हे शाखेला याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने या गुंडाचा शोध सुरू केल्यावर पिंप्राळा शिवारातील सिल्कमिल परिसरात कार (एमएच १९, एई. १३५५) ताब्यात घेतली. कारमध्ये अट्टल गुन्हेगार अरविंद कांबळे (वय २६, रा. कासोळा, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम), खुशाल बोरसे (३०, रामदासवाडी, खडका रोड, भुसावळ), सोनू जयस्वाल (२७, सातेवाडी नाका, वसई ईस्ट, पालघर), रानू ऊर्फ ओमकार भदरगे (२९, शास्त्रीनगर, ठाणे वेस्ट, मुंबई), संदीप लोंढे (३५, १०० फूटी रोड, जळगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पथकाला दोन पिस्तूल, सात जिवंत काडतूस, कोयता, सुरा, मास्क मिळून आले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
असा झाला उलगडा
वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पाचही संशयितांची चौकशी करत संशयितांचे म्हणणे आणि उपलब्ध माहितीची खातरजमा केली. त्यातून पाचही संशयितांना बंटी पथरोड याने ३५ लाखांची सुपारी दिल्याचा उलगडा झाला.
यांचा होता ‘गेम’
भुसावळ येथील मेहतर समाजाचे अध्यक्ष (कै.) मोहन पहिलवान यांचा खून केला होता. समाजाचे अध्यक्षपद त्यांचा मुलगा मिथुन बारसे याच्याकडे आहे. मिथुन, संतोष बारसेचा मुलगा क्रिश आणि राजू सूर्यवंशी यांचा खात्मा करून बारसे टोळी भुसावळच्या गुन्हेगारी पटलावरून नामशेष करण्याचे कारस्थान असल्याचा उलगडा संशयितांनी केला. मोहन बारसे यांच्यासह पूर्ण कुटुंब आणि टोळीचा खात्मा करण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या बंटी पथरोड याने वर्षभरापूर्वीच योजना आखली. त्यासाठी त्याने खुशाल बारसे व संदीप लोंढे यांना ३५ लाखांत दिले. सहा महिने अभ्यास करून ठाण्याहून रानू ऊर्फ ओंकार भदरगे, पालघर येथून सोनू जयस्वाल, वाशिम येथून अरविंद कांबळे यांना सोबत घेतले. त्यांना उमाळा (ता. जळगाव) येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास ठेवले.
‘त्या’ खोलीवर ड्रग्ज आणि पिस्तूल
संशयितांनी चौकशीत दिलेल्या माहितीवरून उमाळ्यातील खोलीची पोलिसांनी झडती घेतली. तेथे आणखी दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे, विक्रीसाठी ठेवलेले ६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इलेक्ट्रिक वजनकाटा, असा २ लाख २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
----------
गुन्हे शाखेमुळे ‘पथरोड गँग’चा कट फसला;
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळात धुमसत असलेल्या गँगवारचा पर्दाफाश केला. परिणामी, बंटी पथरोड याचे बारसे टोळीला संपविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड भुसावळला असताना, गँगवारचा जवळून अभ्यास केल्याने तेथूनच त्यांना ही ‘टिप’ मिळाली. पाचही संशयित अट्टल गुन्हेगार असल्याने त्यांची खास ‘ऑपरेशन थिअटर'' चौकशी झाली. त्यात त्यांनी कटाचा उलगडा केल्याने बंटी पथरोडने भुसावळात रचलेल्या रक्तरंजित टोळी युद्धाचा पर्दाफाश होऊन मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि राजू सूर्यवंशी यांचा जीव वाचला आहे. पाच संशयितांव्यतिरिक्त कटाचा मुख्य सूत्रधार बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर आणि मध्यस्थ रवी होळकर यांचाही संशयितांमध्ये समावेश केला आहे.
चौकट
गुन्हा दाखल होताच फरारी
गुन्हे शाखेने पाचही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या कबुलीनंतर भुसावळची पथरोड टोळी फरारी झाली आहे. म्होरक्या बंटी पथरोड याच्याविरुद्ध १९ गंभीर गुन्हे, शिव पथरोड याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. फरारी गँगस्टरचा गुन्हे शाखा कसून शोध घेत आहे.