संकुलाचा भाग कोसळला

संकुलाचा भाग कोसळला
Published on: 
टुडे पान एकसाठी ------- NSK26H32600 भुसावळ : आठवडे बाजार परिसरातील रस्त्यावर व टपरीवर गुरुवारी कोसळेला व्यापारी संकुलाचा काही भाग. --------------------- भुसावळात व्यापारी संकुलाचा भाग कोसळला ----- जीवितहानी टळली; दुचाकीसह सोडा विक्रेत्याचे नुकसान सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. १५ : शहरातील पालिका हद्दीतील आठवडे बाजार परिसरातील व्यापारी संकुलाचा काही भाग गुरुवारी (ता.१५) सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेत एक दुचाकी व सोडा विक्रेत्याचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आठवडे बाजार परिसरात नागरिकांची व व्यापाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी व्यापारी संकुलाचा भाग कोसळल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना सकाळी घडल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. कोसळलेल्या भागामुळे दुचाकीचे व सोडाविक्रेत्याच्या साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे. अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चेत या व्यापारी संकुलात एका खासगी डॉक्टरांनी पालिका प्रशासनाची परवानगी न घेता शौचालय उभारल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित बांधकामाला परवानगी होती की नाही, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. संकुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. चौकशीची मागणी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असली, तरी संकुलाच्या कोसळलेल्या भागाची सखोल तपासणी करून दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट करणे आवश्यक आहे. शिवाय संकुलातील बांधकामांची स्थिती तपासून संभाव्य धोका दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com