रेल जन संवाद

रेल जन संवाद
Published on: 
मेनफिचर ----------- NSK26H33454 भुसावळ : येथील स्थानकावर रेल्वे जनसंवाद कार्यक्रमात प्रवाशांशी संवाद साधताना विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल व इतर अधिकारी. ------------------------- भुसावळ विभागातील ७० स्थानकांवर ‘रेल जन संवाद’ ---- अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटीत प्रवाशांच्या जाणून घेतल्या समस्या, सूचना अन् अभिप्राय सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. २४ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ७० रेल्वेस्थानकांवर रेल जनसंवाद हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. रेल्वेच्या देशव्यापी उपक्रमाचा हा महत्त्वाचा भाग आहे. प्रलंबित बाबींचे निराकरण करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत प्रवाशांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेत रेल्वे सेवांत सातत्याने सुधारणा करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत सरकारच्या निर्देशानुसार २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सर्व क्षेत्रीय रेल्वे व रेल्वे विभागात स्वच्छता विशेष मोहीम ६ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्वच्छता, कार्यालयीन व सार्वजनिक जागांचे प्रभावी व्यवस्थापन, भंगार व ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट, नागरिकांचा सक्रिय सहभाग यांसारख्या बाबींवर विशेष भर दिला जात आहे. यात देशभरातील सात हजारांहून अधिक रेल्वेस्थानकांवर रेल जनसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमानंतर संबंधित स्थानकांवर स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत आहे. खासदारांची प्रमुख उपस्थिती भुसावळ रेल्वेस्थानकावर आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी केले. यावेळी वरिष्ठ विभागीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. प्रवाशी, शालेय विद्यार्थी सहभागी होते. जळगाव रेल्वेस्थानकावर झालेल्या कार्यक्रमास खासदार स्मिता उदय वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. भुसावळ येथील इलेक्ट्रिक लोको शेडचे मुख्य कारखाना व्यवस्थापक सतीशसिंह चौहान, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी दिलीप खरात, अधिकारी स्थानक व्यवस्थापक कर्मचारी उपस्थित होते. प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद भुसावळ विभागातील ७० स्थानकांवर प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी, स्थानकांवरील उपलब्ध सुविधा, स्वच्छता, प्रवासी सोयी-सुविधा व रेल्वे सेवांबाबतच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. या उपक्रमाची संकल्पना ‘जन की आवाज, युवा की सोच, रेल का समाधान’ अशी आहे. यात विशेषतः तरुणांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. तरुण प्रवाशांना त्यांचे विचार, सूचना व नावीन्यपूर्ण उपाय मांडण्यासाठी प्रोत्साहित करून रेल्वेसेवांत सुधारणा करण्यासाठी लोकसहभागातून व्यावहारिक उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे प्रवाशांनी मांडलेल्या समस्यांचा योग्य पाठपुरावा करणे, त्यांचे निराकरण करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती विकसित करणे व संबंधित विभागांत समन्वय साधणे शक्य होणार आहे. मुलभूत सुविधा देण्यावर भर रेल जनसंवाद हा केवळ प्रवाशांच्या तक्रारी व सूचना ऐकण्यापुरता मर्यादित उपक्रम नसून, रेल्वे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणारा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. प्रवाशांच्या सहभागातून रेल्वेस्थानकांवरील सुविधा, स्वच्छता व एकूण प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होणार आहे. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ, सुविधाजनक व अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून, प्रवाशांच्या सूचना व अभिप्रायांच्या आधारे रेल्वे सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com