02466
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १ लाख ११ हजार रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधी धनादेश सपूर्त करताना नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी
भूषण कासलीवाल यांची आर्थिक मदत
सकाळ वृत्तसेवा
गणूर, ता. १८ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी चांदवड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भूषण जयचंदजी कासलीवाल यांनी सामाजिक दायित्वातून १ लाख ११ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे. मुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी या रकमेचा धनादेश सुपूर्द केला.
राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात त्याची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध स्तरांवर मदतकार्य आणि उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या शासकीय मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कासलीवाल यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही आर्थिक मदत दिली.
संकटाच्या काळात केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे. अशा सामूहिक प्रयत्नांतून गरजू आणि दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळू शकतो, अशी भावना यामागे असल्याचे भूषण कासलीवाल यांनी सांगितले.