Latest Marathi News | वाहनाच्या अपघातात दुचाकी स्वार ठार; 1 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accidental four-wheeler and dead Prakash Barde in the second photo

Nashik News : वाहनाच्या अपघातात दुचाकी स्वार ठार; 1 जखमी

सुरगाणा (जि. नाशिक) : सापुतारा-बोरगाव महामार्गावर दुचाकी व चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी (ता.१०) रात्री हा अपघात झाला. प्रकाश नारायण बर्डे (वय २५, रा. माळेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर रोहित राऊत (वय १९ रा. माळेगाव) गंभीर जखमी झाला. याप्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bike rider killed in vehicle accident 1 injured Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Smart Power Distribution System : स्मार्ट वीजयंत्रणेचा 2200 कोटींची आराखडा

गुजरात मधील सापुतारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या माळेगाव येथील प्रकाश नारायण बर्डे (२५) व रोहित बाबूलाल राऊत (१९) हे दोघेही कामानिमित्त दुचाकीवरून (जीजे ०१ जेझेड ९३९६) बोरगाव येथे गेले होते. काम आटोपून घरी परतत असताना हतगड किल्ला जवळ वाघदेवा जवळील वळणावर सापुतारा कडून बोरगावकडे येणाऱ्या चारचाकी (एम एच १५ ईबी ९०७८) ने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. धडकेत दुचाकीवरील प्रकाश बर्डे हा जागीच ठार झाला. तर रोहीत राऊत हा गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा: Nashik News : वीजप्रश्‍नी सुराणे ग्रामस्थांचा उपकेंद्रात ठिय्या

टॅग्स :NashikAccident Death News