Nashik Bike Theft : चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला; ५ महागड्या गाड्या जप्त
Bike Thief Arrested in Nashik : चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची ‘टीप’ मिळाली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
नाशिक: दुचाकी चोरटा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची ‘टीप’ मिळाली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून, पावणेतीन लाखांच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.