Latest Crime News | दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट!; 4 दुचाक्या लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bike Theft

Nashik Crime News : दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट!; 4 दुचाक्या लंपास

नाशिक : शहर हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने सुरू असून, शहरातील विविध भागातून चार दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर दुचाकी चोरट्यांचे आव्हान कायम आहे.

व्यंकट रामदास निकम (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मोपेड (एमएच- ४१- एआर- ४१९१) १५ ते २० ऑक्टोबर या दरम्यान राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल श्यामसुंदर गायकवाड (रा. शीतल अपार्टमेंट, टकले नगर, जुना आडगाव नाका) यांच्या फिर्यादीनुसार, ते २८ सप्टेंबरला जुने सीबीएसजवळील भूमी अभिलेख कार्यालयात गेले असता, दुचाकी पार्क केली. (bike theft crime increased 4 bikes stolen nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik : घंटागाडी निविदा प्रक्रिया विलंबात मंत्रालयातून दबाव!

परत आले असता, त्यांची दुचाकी (एमएच- १५- सीई- ६२१७) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास भास्कर बोऱ्हाडे (रा. भगवती नगर, टाकळी रोड, जुना कठडा) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी काठे गल्लीतील सैफ अपार्टमेंट येथे पार्क केलेली दुचाकी (एमएच- १५- जीसी- ८८७९) २७ ऑक्टोबरला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ गोकूळ मलगुंडे (रा. मंगलमूर्ती नगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बांधकामाच्या साइटवर कामगार असलेल्या संशयित राजेंद्र भास्कर सोनवणे (३०, रा. साखर कारखाना, पळसे) याच्याकडे त्यांची दुचाकी (एमएच- १५- सीवाय- ७४५१) नारायण बापूनगर येथे घेऊन जाण्यास सांगितले. परंतु संशयित सोनवणे याने दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: SAKAL Impact : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम