नाशिक- चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात पाच-दहा हजारांत विक्री करणाऱ्या तिघांसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांकडून साडेदहा लाखांच्या चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, या पैशांतून संशयित मौजमजा करायचे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कारवाई केली असून, तीन संशयितांना तपासकामी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.