नाशिक : पंचवटी मधील पूरिया पार्कमध्ये ‘पक्षीघर’

पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज उद्‌घाटन
नाशिक : पंचवटी मधील पूरिया पार्कमध्ये ‘पक्षीघर’
नाशिक : पंचवटी मधील पूरिया पार्कमध्ये ‘पक्षीघर’sakal
Updated on

पंचवटी : नाशिक मनपाच्या शहरातील पहिल्या पक्षी घराचे सोमवारी (ता.२५) दुपारी चार वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. पंचवटी कारंजावरील पूरिया पार्क सर्कलवर होणाऱ्या या आगळ्या- वेगळ्या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सतीश कुलकर्णी राहणार आहेत. पक्षी घराच्या उद्‌घाटनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महापालिका प्रभाग पाचमधील पूरिया पार्क गार्डन येथे साकारण्यात आलेल्या या पक्षी घराची उंची ६४ फूट असून त्याला भक्कमपणा येण्यासाठी १० पाया घालण्यात आला आहे. यात जवळपास आठशे घरटी असून अकरा लाख रुपये खर्च आला आहे. यात तीन ते साडेतीन हजार पक्षी वास्तव्य करू शकतात, अशी रचना आहे. गुजरातमध्ये प्रथम हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर तो नाशिकमध्ये प्रथमच राबविण्यात आल्याने मोठी उत्सुकता आहे. या घराच्या पायथ्याला पक्षांसाठी दाणा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

नाशिक : पंचवटी मधील पूरिया पार्कमध्ये ‘पक्षीघर’
हापूसची रत्नागिरीतून थेट ‘रशिया’ वारी; पणन महामंडळाचा पुढाकार

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते पक्षी घराचे उदघाटक होईल. महापौर सतीश कुलकर्णी अध्यक्षस्थानी असतील. नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले, विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, उपमहापौर भिकुबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते यांची उपस्थित राहणार आहेत. दुपारी चारला होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या उदघाटनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी उपमहापौर व प्रभाग पाचचे नगरसेवक गुरमित बग्गा, विमल पाटील, नगरसेविका व मनपातील मनसेच्या गटनेत्या नंदिनी बोडके यांनी केले आहे.

रोज पंचवीस किलो धान्य असाच उपक्रम गुजरातमधील मेहसाना येथे यशस्वीपणे राबविण्यात आल्यावर त्यापासून प्रेरणा घेत नाशिकमध्ये या उपक्रमाची उभारणी करण्यात आल्याचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक गुरमित बग्गा यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. यात एकूण आठशी घरटी असून एका घरात साधारण पाच पक्षी राहू शकतात. म्हणजे संपूर्ण घरात चार हजार पक्षांचे वास्तव्य राहील, असे ते म्हणाले. या पक्षांसाठी साधारण रोज पंचवीस किलो धान्य लागणार असून ते पुरविण्याची जबाबदारी एका अमेरिकास्थित नाशिककराने घेतल्याचे श्री. बग्गा यांनी सांगितले. या उपक्रमासारखाच उपक्रम प्रसिद्ध विकासक नरेंद्रभाई ठक्कर यांनी हिरावाडी येथील गो शाळेतही राबविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com