धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 35054
धुळे : भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य अनुसूचित ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे झालेल्या कार्यक्रमात अभिवादनवेळी उपस्थित मान्यवर, समाजबांधव.
---
भगवान बिरसा मुंडा
जयंतीनिमित्त अभिवादन
ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : थोर स्वातंत्र्यसेनानी, आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य अनुसूचित ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे झालेल्या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश भामरे यांच्या हस्ते पूजन झाले.
ब्रिटिश राजवटीत आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी पुकारलेला ‘उलगुलान’ लढा, तसेच ‘छोटानागपूर कुळवहिवाट कायदा’ या ऐतिहासिक घडामोडींवर या वेळी प्रकाश टाकण्यात आला. अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनतेविरुद्ध जनजागृती करत शिक्षण, स्वच्छता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या ‘बिरसाइत’ पंथाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शहराध्यक्ष नितीन ठाकूर, तालुकाध्यक्ष जगदीश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष किरण भामरे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, ज्येष्ठ पदाधिकारी देवानंद ठाकूर, हेमराज ठाकूर, भूपेंद्र वाघ, महेश ठाकूर, गिरीश महाले, किरण वाघ, पंकज भामरे, मनोज सूर्यवंशी, संदीप ठाकूर, अतुल भामरे उपस्थित होते.