आज जनजातीय गौरव दिवस

आज जनजातीय गौरव दिवस
Published on: 
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम जनजातीय गौरव दिवस; विविध उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१४ : शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या वतीने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त उद्या (ता.१५) जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील खासदार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक प्रगती तसेच आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (जी. एस. ग्राऊंड), जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या भव्य प्रभातफेरीने होणार आहे. या प्रभातफेरीत क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा जनजागृतीपर संदेश दिला जाणार आहे. आदिवासी बांधव, भगिनी, विद्यार्थी, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.