धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 35214
धुळे : विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे क्रांतिकारी जननायक बिरसा मुंडाजी बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर, खेळाडू.
---
बिरसा मुंडा बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन
विद्यावर्धिनी महाविद्यालय स्पर्धा; जिल्ह्यात प्रथमच
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : क्रांतिकारी जननायक बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, धुळे जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन आणि विद्यावर्धिनी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या गटातील आमंत्रित बॉल बॅडमिंटन लीग स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक उदय शिनकर यांच्या हस्ते झाले. विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे १४ व १५ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा पार पडली.
बिरसा मुंडा यांच्या संघर्ष व बलिदानातून युवकांना प्रेरणा मिळावी आणि होतकरू खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, या उद्देशाने जिल्ह्यात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात संभाजीनगर, कन्नड, जळगाव, चाळीसगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या तीन संघांना करंडक, तसेच उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत. उद्घाटनप्रसंगी देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सहसचिव परेश उपकारे, ॲड. अमोल पाटील, ॲथलेटिक्सचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रा. प्रशांत लगडे, माजी खेळाडू जगदीश पाटील, सागर मोगल, प्रा. दीपक गिरासे, सुशील पाटील, अविनाश गुंडीयाल, प्रशांत जाधव, चावरा सीबीएसई स्कूलचे क्रीडाशिक्षक शुभम धामोडे, पप्पू माळी आणि शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष भालचंद्र सोनगत उपस्थित होते. या वेळी जिल्हा न्यायालयाच्या कोर्ट लायब्ररी निवडणुकीत विजयी झालेले माजी विद्यार्थी ॲड. अमोल पाटील, तसेच राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बॉल बॅडमिंटनचे प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू अनिल गवळी, रोहित भतवाल, पप्पू माळी, राजेश खोपे, सुरत जावळे, सागर राजपूत, गौरव नवले, प्रसाद बच्छाव, धनंजय महाजन, शिरीष सूर्यवंशी, अमित गवळी, भावेश गवळी, जय शहा, फैजल पठाण, फैजान शेख, रेहान कुरेशी, फैजल कुरेशी, रोहिणी राऊत, विद्या वसावे संयोजन करत आहेत. माजी राष्ट्रीय खेळाडू प्रा. संदीप महाले यांनी सूत्रसंचालन केले. शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष भालचंद्र सोनगत यांनी आभार मानले.