भगवान बिरसा मुंडा हे त्यागाचा सुवर्ण अध्याय भाजप नेते उदय सांगळे यांचे जंयती कार्यक्रमात प्रतिपादन

भगवान बिरसा मुंडा हे त्यागाचा सुवर्ण अध्याय  भाजप नेते उदय सांगळे यांचे जंयती कार्यक्रमात प्रतिपादन
Published on: 
फोटो-23532 सिन्नर ः भाजपच्या संपर्क कार्यालयात बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करताना पदाधिकारी. बिरसा मुंडा यांचा लढा त्यागाचा सुवर्णअध्याय ः सांगळे सिन्नर, ता. १५ ः भगवान बिरसा मुंडा केवळ आदिवासी समाजाचेच नेते नव्हे, तर संपूर्ण भारताचे अभिमान होते. अन्याय, अत्याचार आणि ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांनी कमी वयात क्रांतीची मशाल पेटवली. आदिवासी बांधवांच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा हा संघर्ष, स्वाभिमान आणि त्यागाचा सुवर्णअध्याय असल्याचे प्रतिपादन भाजप नेते उदय सांगळे यांनी केले. भाजपक्षाच्या संपर्क कार्यालयात झालेल्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, शहराध्यक्ष सजन सांगळे, नगरसेवक अनिल सरवार, आशा कर्पे, दौलत केकाण, कन्हैया वरंदळ, डॉ. आनंदा सानप, बाळासाहेब सदगीर, रामचंद्र रोडे, नीलेश लोणारे, रूपेश मुठे, डॉ. तुषार सोनवणे, बाळासाहेब कराड, विनायक कदम, दत्तात्रेय आचार्य, दीपक सुडके, सुभाष कर्पे आदी उपस्थित होते. सांगळे म्हणाले, की समाजातील अंधश्रद्धा, शोषण आणि अन्यायाविरुद्ध जनजागृती करत त्यांनी आदिवासी समाजामध्ये एकता, स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची भावना जागृत केली. त्यांनी दिलेला ''उलगुलान'' अर्थात, महान क्रांतीचा नारा आजही प्रत्येकाला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देतो. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य आणि देशासाठी दिलेले बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहणार असल्याचे ते म्हणाले. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.