गंगाघाटावर १४-१५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा महोत्सव

गंगाघाटावर १४-१५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा महोत्सव
Published on: 
टूडे साठी ------------- गंगाघाटावर १४ पासून बिरसा मुंडा महोत्सव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गंगाघाट परिसरातील जुने भाजी पाटांगण येथे १४ व १५ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय भव्य महोत्सव होणार आहे. दिंडोरी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अविनाश बाबुराव जाधव यांच्या पुढाकारातून साई श्रद्धा सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचा वापर करून भगवान बिरसा मुंडा यांची भव्य प्रतिकृती मोजॅक आर्टमधून साकारली जाणार आहे. आदिवासी लोककला, लोकनृत्य, पारंपरिक वेशभूषा पथकांचे सादरीकरण होणार असून सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या स्वागतार्थ गोदावरी मातेची सामूहिक महाआरतीही होणार आहे. मोठी गर्दी अपेक्षित असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या कार्यालयाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यक्रमस्थळाची परवानगी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, प्रवेशमार्गावरील पथदिवे, प्रथमोपचार पथक आणि अग्निशमन दलाची सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. महाआरतीवेळी घाटावर गर्दी नियोजनासाठी विशेष व्यवस्था करण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.