वणी येथे खा. भास्कर भगरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सन्मानपत्रांचे वाटप

वणी येथे खा. भास्कर भगरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सन्मानपत्रांचे वाटप
Published on: 
13515 वणी ः पंचायत समिती दिंडोरी व ग्रामपंचायत कसबे वणी यांच्यातर्फे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना सन्मानपत्र व चारा बियाण्यांचे वाटप करताना खासदार भास्कर भगरे, सरपंच मधुकर भरसट, विलास कड आदी. खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सन्मानपत्रांचे वाटप सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १९ : पंचायत समिती दिंडोरी व ग्रामपंचायत कसबे वणी यांच्यातर्फे बिरसा मुंडा यांची जयंती सप्ताह सुरू आहे. यानिमित्त खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत नवीन सिंचन विहिरींचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सन्मानपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. वणी येथील खंडेराव महाराज मंदिर सभागृहात हा कार्यक्रम झाला. खासदार भास्कर भगरे अध्यक्षस्थानी होते. कसबे वणीचे सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, गटविकास अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे, तालुका पशुधन व दुग्ध विकास अधिकारी डॉ. वायडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, कार्यालयीन कक्ष अधिकारी नितीन दळवी आदी उपस्थित होते. गटांच्या सदस्यांना शिबिरांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य विभागातर्फे झालेल्या शिबिरात नागरिकांची ताप, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना चारा पिकांच्या बियाण्यांचे वाटप झाले. उत्कर्ष कोंडावर यांनी सूत्रसंचालन केले. .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.