धुळे : टुडे पान २ साठी...
--
धुळ्यात उद्या भाजपतर्फे
राष्ट्र चिंतन संवाद कार्यक्रम
--
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विविध उपक्रम
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भाजप महानगरतर्फे विविध कार्यक्रम होत आहेत. बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नुकताच दीपोत्सव साजरा झाला. तसेच स्व. महादेव अंपळकर स्मृती भाजप जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या निर्देशानुसार ‘लोकतंत्र बचावो, अराजकता हटावो’ अभियानांतर्गत शुक्रवारी (ता. २०) येथे ‘राष्ट्र चिंतन संवाद’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार उपस्थित राहतील.
-
राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, महापौर मायादेवी परदेशी, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे उपस्थित राहतील. ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमात डॉक्टर, अभियंते, सनदी लेखापाल (सीए), व्यापारी, उद्योजक, आध्यात्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होऊन राष्ट्रहित आणि लोकशाही मूल्यांवर विचारमंथन करणार आहेत. भाजप शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, संयोजिका नगरसेविका कविता कोळी (सोनवणे) यांच्या मार्गदर्शनात आयोजन होत आहे. कार्यक्रमास पस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.