वणी - बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती उत्साहात

वणी - बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती उत्साहात
Published on: 
13513 वणी ः क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांचे प्रतिमेस अभिवादन करताना खासदार भास्कर भगरे, सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, प्रा. अशोक बागूल, प्रशांत कड आदी. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे जयंतीनिमित्त वणीत रोषणाई सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १५ : आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती उत्सव वणी येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौकात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साध्या रीतीने साजरी झाली. कळवण- सापुतारा त्रिफुलीवरील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौकातराघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या जयंती संयुक्तरीत्या साजरी झाली. जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौकात सापुतारा, कळवण व नाशिक रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक कमानी उभारून चौकाच्या वर्तुळाकारभोवती आकर्षक कमानी व सजावट करून रोषणाई करण्यात आली होती. रविवारी (ता. १५) सकाळी धानपूजनाने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती उत्साहास प्रारंभ झाला. धानपूजन परशराम भोये यांच्या हस्ते झाल्यानंतर प्रतिमापूजन झाले. प्रमुख पाहुणे खासदार भास्कर भगरे यांंनी क्रांतीविरांना अभिवादन करीत क्रांतिवीरांच्या जयंती उत्सव नृत्याआविष्कराने जल्लोष करून साजरा करण्याऐवजी त्यांचे विचारांची क्रांती स्वत: आत्मसात करुन समाजापर्यंत पोहचिवण्याचे कार्य तरुणांनी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आदिवासी बचाव अभियानाचे प्रमुख प्रा. अशोक बागूल यांनी क्रांतिवीर बिरसांनी सात-बारा उताऱ्यावर आदिवासींचे नाव इग्रंजाना लावावे लागल्याची ऐतिहासिक माहीती देऊन आदिवासी तरुणांना मार्गदर्शन केले. उपसरपंच विलास कड, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, नरेंद्र वड, सतीश जाधव, संविधान गांगुर्डे यांनीही अभिवादन केले. सरपंच मधुकर भरसट, भास्कर फुगट, बाळासाहेब घडवजे, गणेेश देशमुख, विशाल देशमुख, राजेंद्र गोतरणे, बबलू शेख, रोशम समदडिया, के. के. गांगुर्डे, पंकज ठाकरे उपस्थित होते. बबिता गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अमोल गावित यांनी आभार मानले. ............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.