जिल्ह्यात विशेष पंधरवडा

जिल्ह्यात विशेष पंधरवडा
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.... -- बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्ह्यात विशेष पंधरवडा -- आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी, स्वच्छतेचा होणार जागर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २९ : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एक ते १५ नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव दिन पंधरवडा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले असून, आदिवासी वस्त्यांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे. अभियानांतर्गत वैयक्तिक कुटुंब नळ जोडण्या वितरित करणे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी व पाणी गुणवत्तेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ग्राम पाणी व स्वच्छता समिती, पाणी समिती तसेच आदिवासी युवक व महिलांसाठी पाणीपुरवठा योजनांचे संचालन व देखभालीसंदर्भात प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय आदिवासी भागातील यशोगाथा, उत्कृष्ट कार्यपद्धती आणि लाभार्थ्यांचे अनुभव यांचे दस्तऐवजीकरण करून व्यापक प्रसार केला जाईल. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची आयएमआयएस प्रणालीवरील वर्गीकृत माहिती अद्ययावत ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी हे उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com