(पान ३ ला मेन)
फोटो : NSK26H34381/ NSK26H34388
दादार : जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माहितीपत्रकाचे प्रकाशन करताना रवींद्र चव्हाण, सतीश धोंड, डॉ. हेमंत विष्णू सवरा, राजेश पांडे, संजय पुराम, राजेश पाडवी, संतोष जनाटे, विरेंद्र शहा आदी. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित डॉ. सुप्रिया गावित.
---------------
बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी कटिबद्ध
डॉ. हीना गावित यांचे प्रतिपादन; जनजातीय गौरव दिन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ३ : महान स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य गावा- गावातील प्रत्येक आदिवासी घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम यशस्वी करूया. भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्यास आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे विचार भाजपच्या जनजातीय गौरव समितीच्या सहसंयोजक माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी व्यक्त केले.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशतर्फे मुंबई (दादर) येथील वसंतस्मृती कार्यालयात आयोजित ‘जनजातीय गौरव दिन कार्यशाळा’ तसेच भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात झाली. त्या वेळी डॉ. गावित बोलत होत्या. या वेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सह संघटनमंत्री सतीश धोंड, खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार संजय पुराम, आमदार राजेश पाडवी, महाराष्ट्र राज्य जनजाती आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, संतोष जनाटे, विरेंद्र शहा आदी उपस्थित होते.
आदिवासी समाजाची वज्रमूठ उभारत ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व करणारे महान स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकार १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा शौर्यशाली इतिहास आणि प्रेरणादायी विचार जनमानसापर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे विचार या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सह संघटनमंत्री सतीश धोंडजी, खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार संजय पुराम आदींच्या हस्ते आदिवासी वीर पुरुषांच्या प्रतिमेचे तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.