धुळे : टुडे पान १ साठी... सिंगल
---
फोटो क्रमांक : 35084
धुळे : क्रांतीनायक भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त अभिवादनवेळी उपस्थित मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, नितीन जोशी, कैलास मासाळ आदी.
भगवान मुंडा यांना
मनपात अभिवादन
धुळे : क्रांतीनायक भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महापालिका सभागृहात रविवारी (ता. १५) त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, नितीन जोशी, कैलास मासाळ, नंदू सोनवणे, दिनेश माळी, दीपक गायकवाड आदीसह महारपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---
फोटो क्रमांक : 35072
धुळे : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रतिमपूजनवेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी.
भगवान मुंडा यांना
जयंतीनिमित्त अभिवादन
धुळे : आदिवासी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक, स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाचा प्रेरणादायी इतिहास घडविणारे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस रविवारी (ता. १५) पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांचे कार्य सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानाच्या मूल्यांची जाणीव करून देणारे आहे. सहायक महसूल अधिकारी विजय बावा, कैलास सैंदाणे, तांत्रिक सहायक जावेद खान यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
-
फोटो क्रमांक ः 35122
निमझरी ः भगवान मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आर. सी. पटेल आश्रमशाळेतील कार्यक्रम उपस्थित विद्यार्थी व शिक्षक.
भगवान मुंडा यांच्या
जयंतीनिमित्त कार्यक्रम
धुळे ः निमझरी (ता. शिरपूर) येथील आर. सी. पटेल आश्रमशाळेत जनजातीय गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतीसूर्य तथा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनही झाले. सामाजिक कार्यकर्ते बजरंग भील, गणेश भील, दिलीप भील तसेच शाळेचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस. आर. खैरनार, आर. जे. वसावे, अधीक्षक एस. व्ही. ठाकरे उपस्थित होते.