NSK26H35093
नाशिक ः बिरसा मुंडा यांना अभिवादन करताना नीलेश खैरे, संतोष ठाकूर, ज्ञानेश्वर काळे.
---------
बिरसा मुंडा यांना
काँग्रेसचे अभिवादन
नाशिक : थोर क्रांतिकारक आणि आदिवासींचे जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहर काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात हा कार्यक्रम झाला. काँग्रेसचे शहराध्यक्ष नीलेश खैरे व अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री. खैरे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. ‘ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध अन्यायाच्या विरोधात लढा देणारे बिरसा मुंडा हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा आजही समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची ऊर्जा देतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केली. गौरव सोनार, संतोष ठाकूर, ज्युली डिझुजा, अनिता खरारे, मंगेश लहांमगे, ज्ञानेश्वर काळे, अभिजित राऊत, प्रभाकर धात्रक, प्रा. आदिनाथ नागरगोजे, रोहित वाघ, दत्तात्रय सोनवणे, संतोष कस्तुरे, श्रीकांत शेरे, इसाक कुरेशी, दाऊद शेख, पोपटराव नागपुरे, स्वरूप पिसे, विजय चव्हाण, अरूण दोंदे, गोरख साळवे, रवी पवार उपस्थित होते.
------------------