नाशिक रोड- उन्हाळा लक्षात घेऊन नाशिक रोड येथील बिटको हॉस्पिटलमध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी दहा बेड राखीव ठेवण्यात आले आहे. सध्या उन्हाची तीव्रता जाणवायला सुरवात झालेली असली तरी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये प्रचंड उकाडा वाढणार आहे.