नाशिक- काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. भाजपने ‘१०० प्लस’ मिशनसाठी राजकीय ताकद वाढवत माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप, अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर आदींचा पक्षप्रवेश घडवून आणला. मात्र, या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.