Municipal Election
sakal
नाशिक: ‘एबी फॉर्म’ वाटपावरून भारतीय जनता पक्षात एकीकडे राडा पाहायला मिळाला; तर दुसरीकडे जवळपास २५ विद्यमान नगरसेवकांच्या उमेदवारीवर फुली मारण्यात आल्याने त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे ऐनवेळी काहींनी पक्ष बदल केला तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान कायम ठेवले.