Police commissioner Nashik
sakal
नाशिक: विल्होळी परिसरातील एका फार्म हाऊसवर भाजपच्या इच्छुक उमेदवारांवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली असता, त्यावेळी एकाने आत जाण्यावरून थेट पोलिस आयुक्तांशीच हुज्जत घातली. ‘आमदाराचा जावई’ असल्याचे सांगितल्यानंतर त्यास आत प्रवेश दिला. परंतु, त्या जावयाने गुपगुमान जाण्याऐवजी आयुक्तांच्या नजरेला नजर भिडविल्यानेे आयुक्तांनी त्याला ‘पोलिसी झटका’ देत बाहेरचा रस्ता दाखविल्याचा प्रकार घडला. राजकीय वर्तुळात ही चर्चा चांगलीच रंगली होती.