जिल्हा बँक निवडणूक भाजप बैठक

जिल्हा बँक निवडणूक भाजप बैठक
Published on: 
जिल्हा बँक निवडणूक (लोगो) ---- मित्रपक्षांसोबत युतीसाठी भाजप अनुकूल उपशीर्षक गिरीश महाजनांचे संकेत; पक्षाच्या बैठकीत जागेनिहाय आढावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून छाननीदरम्यान झालेल्या घडामोडींमुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत. असे असताना मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (ता. ६) निवडणुकीसाठी मित्रपक्षांसोबत युतीसाठी अनुकूल असल्याचे संकेत दिले. एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी मतदारसंघ व जागेनिहाय उमेदवारी, विजयी होण्यासंबंधी शक्यता याचा आढावा घेतला. मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी एमआयडीसीतील हॉटेल इन्फिनिटीत झाली. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी व चंद्रकांत बाविस्कर, दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बँक निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कशा स्वरूपाचे नियोजन करता येईल, याबाबत चर्चा झाली. नंतर श्री. महाजन यांनी सोसायटी मतदारसंघ, महिला राखीव जागा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आदी गटनिहाय जागांवरील उमेदवारांसंदर्भात आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघात आपली मते किती आहेत? निवडून येण्याची शक्यता किती, याबाबत त्यांनी प्रश्‍न विचारले व माहिती जाणून घेतली. मित्रपक्षांना सोबत घेणार जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बँकेवर असणे अपेक्षित असून, त्यादृष्टीने आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत. काही तालुक्यांच्या ठिकाणी आमचे मित्रपक्ष प्रभावी आहेत. काही तालुक्यांमध्ये आमचे वर्चस्व आहे, ते डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवू, असे श्री. महाजन यांनी स्पष्ट केले. सुमीत पाटलांचा अर्ज तांत्रिक कारणाने बाद पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा अर्ज बाद ठरविल्याने शिवसेनेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, महाजनांनी याबाबत स्पष्ट करताना अर्ज बाद होण्यात कुणाचाही काहीही हस्तक्षेप नाही. तांत्रिक कारणांमुळे तो बाद झाला असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.