Nashik: BJPच्या उमेदवाराचे भवितव्य NCPच्या हाती! केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Bharti Pawar, Chhagan Bhujbal, Narahari Jirwal, Nitin Pawar, Ramdas Charoskar
Bharti Pawar, Chhagan Bhujbal, Narahari Jirwal, Nitin Pawar, Ramdas Charoskaresakal

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाने राजकीय समीकरणे बदलणार असून, लोकसभा निवडणुकीतही मोठी उलथापालथ होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली असल्याने भाजपचा बालेकिल्ला झालेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा दोर ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघांवर अजित पवारसमर्थक राष्ट्रवादीच्या आमदारांचे वर्चस्व आहे. परिणामी येथे उमेदवारी निश्चित करताना भाजपला राष्ट्रवादीलाही विश्वासात घ्यावे लागणार आहे.

पाच वर्षांपूर्वी ज्या राष्ट्रवादीने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उमेदवारी कापली त्याच नेत्यांच्या हाती उमेदवारीचे भवितव्य जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. (BJP candidates fate in hands of NCP possibility of increase in problems of Union Minister of State nashik political)

बारातमीनंतर सर्वांत सुरक्षित मतदारसंघ म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असे राष्ट्रवादीकडून सांगितले जात होते. मात्र, गत चार पंचवार्षिक निवडणुकांपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हाती लागलेला नाही.

येथे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. गत निवडणुकीत सलग तीनवेळा खासदारकी भूषविलेले चव्हाण यांचा पक्षांतर्गत कलहामुळे ऐनवेळी पत्ता कट करण्यात आला होता.

दिल्ली पोहचण्यासाठी राष्ट्रवादीकडून तयारी करत असलेल्या डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादीने पवार कुटुंबीयांच्या वादामुळे उमेदवारी नाकारली. याचाच फायदा भाजपने उचलत चव्हाण यांना डावलून डॉ. पवार यांनी उमेदवारी दिली होती.

भाजपच्या लाटेत राष्ट्रवादीकडून मिळालेली सहानुभूती व वैयक्तिक जनसंपर्काच्या जोरावर डॉ. पवार दिल्लीत पोचल्या.

सतत पायाला फिंगरी लावून लोकांत राहणे तसेच कोरोना संकटातील डॉ. पवार यांच्या कामाची दखल घेत डॉ. पवार यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदावर काम करण्याची संधी भाजपने दिली. यानिमित्ताने जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रिपदाचा बहुमान मिळाला.

अडीच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याने त्यांचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.

Bharti Pawar, Chhagan Bhujbal, Narahari Jirwal, Nitin Pawar, Ramdas Charoskar
Nashik Sharad Pawar : शरद पवारांचे येवल्यातील ‘आशीर्वाद’चे परिणाम असतील मोठे : रोहित पवार

मात्र, शिवसेनेतंर्गत फूट पडून शिंदे गट बाहेर पडला. यामुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन शिंदे गट व भाजप राज्यात सत्तेत आली. दोन गटांत विखुरलेल्या शिवसेनेचे पडसाद मतदारसंघात दिसत असतानाच राष्ट्रवादीत उभी फूट पडली.

अजित पवार यांसह आमदारांच्या गटाने भाजपशी युती करत थेट सत्तेत सहभागी झाले. शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने याचे पडसाद या मतदारसंघावर पडणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांची आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित मानली जात होती.

मात्र, राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने समीकरण बदलणार आहे. या मतदारसंघामधील चार विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीचे प्राबल्य असून, येवल्याचे छगन भुजबळ तर अजित पवार यांच्यासमवेत कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

तर दिंडोरीचे नरहरी झिरवाळ, कळवण-सुरगाण्याचे आमदार नितीन पवार, निफाडचे दिलीप बनकर खुलेपणाने अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांची वाट काहीशी बिकट होण्याची शक्यता आहे.

एकसंघ महाविकास देणार उमेदवार

राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या महाविकास आघाडीची भूमिका मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे. या आघाडीत कोणत्या पक्षाला जागा मिळते, त्यांचा कोणता उमेदवार असणार हेही निर्णायक असणार आहे.

भाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवार येथे महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. महाविकास आघाडीकडून माजी आमदार रामदास चारोस्कर यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, माजी सभापती सुनीता चारोस्कर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bharti Pawar, Chhagan Bhujbal, Narahari Jirwal, Nitin Pawar, Ramdas Charoskar
Political Astrology: फडणवीस-अजितदादांची मैत्री राजकारणात दीर्घकाळ दिसणार! दोघांना राजकीय उच्चपदाचे योग

अन्यथा माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना महाविकास आघाडीत घेऊन तेदेखील रिंगणात उतरविण्याची चाल आघाडीकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काय होऊ शकते...

- मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने अजित पवार गट या मतदारसंघावर दावा करू शकतो. यात अजित पवार गटाकडून झिरवाळ किंवा नितीन पवार यांचे नाव पुढे येऊ शकते. त्यांना उमेदवारी देणे शक्य न झाल्यास भाजप उमेदवारी देऊ शकते.

- या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आमदार पवार यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादी गटाकडून त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह भाजपकडे होऊ शकतो.

- (स्व.) ए. टी. पवार यांच्या कुटुंबातील वाद सर्वश्रुत असल्याकारणाने आमदार पवार यांच्याकडून डॉ. भारती पवार यांच्या नावाला विरोध झाल्यास भाजपला अन्य उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल.

- अन्यथा (स्व.) ए. टी. पवार कुटुंबाने आपापसांतील मतभेद दूर करत एकत्र आल्यास डॉ. पवार यांच्या उमेदवारीचा तिढा लवकर सुटू शकतो.

- शिंदे गटाच्या शिवसेनेकडून माजी आमदार धनराज महाले लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शिंदे गटालाही देखील भाजप व राष्ट्रवादीला विश्वासात घ्यावा लागणार आहे.

Bharti Pawar, Chhagan Bhujbal, Narahari Jirwal, Nitin Pawar, Ramdas Charoskar
NCP Ajit Pawar : नरडाण्यात शरद पवार समर्थकांचे आंदोलन; अजित पवारांचा निषेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com