Girish Mahajan
sakal
नाशिक: मुख्यमंत्री महोदयांना ८० प्लस जागांचे आश्वासन दिले होते. मात्र, एबी फॉर्म वाटपाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे आठ-दहा जागांचा फटका बसला आणि ७४ जागांवर समाधान मानावे लागले. तरीही हे पूर्ण समाधान नसल्याचे स्पष्ट करीत ‘१०० प्लस देण्याचा मानस होता’ अशी कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (ता. १६) येथे दिली.