बिटको हॉस्पिटल तोडफोड प्रकरण : नगरसेविकेचे पती अखेर आले शरण!

bytco hospital
bytco hospitalesakal

नाशिक रोड : येथील बिटको रुग्णालयात (bytco hospital) तोडफोड करणारे भाजपा नगरसेविका (bjp corporator) सीमा ताजणे (corporator seema tajne) यांचे पती राजेंद्र ताजने (rajendra tajne) यांनी इनोव्हा कार रुग्णालयात घुसवत रुग्णालयाची (१५ मे २०२१) तोडफोड केली होती. नगरसेविकेच्या पतीने थेट बिटको हॉस्पिटलमध्ये गाडी घुसविली होती आणि हॉस्पिटलची तोडफोड केली होती. बिटको हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन (remdesevhir) मिळत नसल्याचा आरोप करत व इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करत मेन गेटची तोडफोड ताजणे यांनी केली होती. पण याच प्रकरणी अडीच महिन्यांपासून फरारी असलेला राजेंद्र ऊर्फ कन्नू ताजणे अखेर नाशिक रोड पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.

अन् नगरसेविकेचा पती स्वत:हून शरण आला....

कोरोनाकाळात बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाही, म्हणून नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी १५ मेस नवीन बिटको रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशवराच्या काचेवर इनोव्हा गाडी घुसून मोठे नुकसान केले होते. ही घटना घडल्यानंतर ताजणे फरारी होते. दरम्यान, ही घटना संपूर्ण राज्यात गाजली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी इनोव्हा कार जप्त केली होती. मात्र, ताजणे फरारी होते. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ताजणे यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला.दरम्यान, नाशिक रोड पोलिसांनी राजेंद्र ताजणे यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. अखेर ताजणे सोमवारी (ता. २) सायंकाळी नाशिक रोड पोलिस ठाण्यात स्वतःहून शरण आले. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बिटको हॉस्पिटल (bytco hospital) तोडफोडप्रकरणी अडीच महिन्यांपासून फरारी असलेला राजेंद्र ऊर्फ कन्नू ताजणे अखेर नाशिक रोड पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.

तोडफोड करण्याची वेळ का आली?

बिटको रुग्णालय तोडफोडीचे समर्थन मी करणार नाही; मात्र राजेंद्र ताजणे यांना तोडफोड आंदोलन करण्याची वेळ का आली? हे सुरवातीला प्रशासनाने जाणून घ्यायला हवे. बिटको हॉस्पिटलमध्ये अनेक दिवसांपासून लोक मृत्यू होत आहेत. याची कारणे वेगळी असली तरी लोकांना आरोग्य सोयीसुविधा मिळत नसून येथील स्टाफ लोकांशी व्यवस्थित वागत नाही. या कोविड सेंटरचे प्रमुख डॉक्टर जितेंद्र धनेश्वर हे खरोखर लोकसेवी डॉक्टर आहेत, मात्र रुग्णालयात असणाऱ्या असुविधा या सर्व मृत्यूला कारणीभूत आहेत. तोडफोड करण्याची वेळ का आली, याची कारणे प्रशासनाने जाणून घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग वीसच्या नगरसेविका सीमा ताजणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली त्यावेळी दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com