धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 34078
धुळे : शहरात भाजपच्या लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ पदयात्रेत शुक्रवारी सहभागी मंत्री जयकुमार रावल, डॉ. सुभाष भामरे, अनुप अग्रवाल, मायादेवी परदेशी, बापू खलाणे, गजेंद्र अंपळकर, बबन चौधरी व पदाधिकारी.
--
देशविघातक ताकदींना उलथवून टाका
-
मंत्री रावल : लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ पदयात्रा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३० : निवडणूक आयोगाच्या सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या आडून काँग्रेससह विरोधी पक्ष आणि परकीय शक्ती भारतातील घटनात्मक संस्थांवर हल्ले करत आहेत. या माध्यमातून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न होत असून, विरोधी पक्षांचे हे मनसुबे जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही. देशातील विघातक ताकदींना उलथवून टाकू, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी (ता. ३०) येथे पत्रकार परिषदेसह एका सभेतून दिला.
-
‘एसआयआर’च्या विरोधात आंदोलने करून अराजकता माजवणाऱ्या विरोधी पक्षांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते जमनालाल बजाज रोडपर्यंत लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ पदयात्रा काढण्यात आली. पालकमंत्री रावल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महिला आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षा धरती देवरे, स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, बाळासाहेब भदाणे, भाऊसाहेब देसले, किशोर सिंगवी, शशी मोगलाईकर, पवन जाजू, सुनील कपिल, पृथ्वीराज पाटील, अजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले, की निवडणूक आयोगाने देशात आतापर्यंत १२ वेळा विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली. त्यापैकी १० वेळा काँग्रेस सत्तेत असताना ही प्रक्रिया झाली. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून, तिचा सरकारशी थेट संबंध नसतो. मात्र, पराभव पचवता येत नसल्याने काँग्रेससह विरोधक निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘एसआयआर''ला विरोध करून बेकायदेशीर घुसखोरांना वाचविण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती सहन न झाल्याने परदेशी निधी, फेक नरेटिव्ह, टूलकिट व मीडिया कॅम्पेनिंगद्वारे नवी दिल्लीत आंदोलने घडवून शांतता भंग केली जात आहे, असा आरोपही पालकमंत्र्यांनी केला.
१४-१
...चौकट...
१४-१
‘तो’ प्रयत्न हाणून पाडू
विरोधक स्वतःच्या पराभवाचे खापर घटनात्मक संस्थांवर फोडून लोकशाही कमकुवत करत आहेत. देशातील जनता ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व मानणारी असून, ती विरोधकांचे मनसुबे उधळून लावेल. या अराजकतेविरुद्ध सर्व देशवासीयांनी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले. तसेच विरोधकांचे मनसुबे हाणून पाडू, असेही ते म्हणाले.