Nashik BJP News : भाजप कार्यकारिणीत नाशिकला ठेंगा!

bjp
bjpesakal

Nashik BJP News : भाजपकडून बुधवारी (ता. ३) जाहीर करण्यात आलेल्या ९०० पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीमध्ये प्रदेश सरचिटणीस उपाध्यक्ष व चिटणीस या महत्त्वाच्या पदांवर नाशिकमधून एकाही पदाधिकाऱ्यांची निवड झाली नाही. मात्र कार्यकारिणी सदस्यांमध्ये ४१ जणांना स्थान देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. (BJP executive Nashik poolitical News)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ९०० पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी घोषित केली. यामध्ये सोळा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली.

परंतु या संपूर्ण यादीमध्ये नाशिकला मात्र महत्त्वाची पदे दिली गेली नाही. कार्यकारिणीमध्ये कार्यकारिणी सदस्यपदी लक्ष्मण सावजी, शंकर वाघ, अशोक व्यवहारे, दादाजी जाधव, तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, बाळासाहेब सानप, विठ्ठल चाटे, अमृता पवार, तनुजा घोलप यांना संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

bjp
ZP Staff Transfer: रिक्त पदांचा समतोल साधून बदल्यांसाठी ग्रामविकासाला साकडे; मागविले मार्गदर्शन

हे आहेत निमंत्रित सदस्य

माजी महापौर सतीश कुलकर्णी, डॉ. निशिगंधा मोगल, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदीप पेशकार, विजय साने, अजिंक्य साने, अलका अहिरे, मनीषा पवार, डॉ. प्रशांत पाटील, आशिष नहार, एन. डी. गावित, दादाराव जाधव, सोपान दरेकर, बिंदूशेठ शर्मा, मनोज दिवटे,

योगेश माईंद, माधुरी पठार पालवे, महेश श्रीश्रीमान, स्मिता मुठे, शंकर वाघ, महेश मुळे, रोहिणी वानखेडे, रवींद्र अमृतकर, सुनील वाघ, डॉ. संध्याताई तोडकर, गोविंद बोरसे, नितीन पोफळे, बापूसाहेब पाटील, अनिकेत पाटील, सतीश मोरे, सुरेश निकम, प्रवीण अलई, डॉ. वैभव महाले, तुषार भोसले.

bjp
Nashik News : प्रशिक्षणार्थी परिचारिकेचा आत्महत्त्येचा प्रयत्न?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com