नाशिक- सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून खूप अपेक्षा होती. चंद्रचूड यांनी का न्याय दिला नाही, अडीच वर्षे बेकायदेशीर सरकार चालले. असा प्रश्न उपस्थित करून सर्व पक्षांनी जबाबदारपणे, कृतज्ञतापूर्वक आणि समंजसपणाने वागले पाहिजे; पण भारतीय जनता पक्षातील सर्व गॅंग छोट्या मनाच्या आहेत. कुणीही मोठे होणार नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली.